"शब्द होते वेडे वाकडेच पण भावना मात्र कागदावर हळूच उमटून गेल्या......."

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

व्यक्ती

आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात पण प्रत्येक जण
सारखा नसतो ...
तरी देखील आपण सर्वांना एकाच पारड्यात का
मोजत असतो ...

काहींचा सहवास मग लाभतो आपणास
कायमचा ...
तर काहींचा सहवास असे अगदी काही
क्षणांचा ...

काहींशी मग राहते नाते  फक्त ओळखीचे ...
तर काहींशी जुळते नाते अगदी हक्काचे ...

पण त्यातील प्रत्येकजण  देतो आपणास काही कडू-
गोड अनुभव ...
मात्र त्यातीलच काही आठवणी कोरतात आपल्या
हृदयात एक सुरेख घर ...

एकटेपणा सोडत नसे कधी कोणाला ...
म्हणून मग माणूस शोध घेत राही अश्याच अनेक
व्यक्तींचा ...

माणूस आणि त्याच्या भवतालचे हे विश्व नकळत जोडीत
असे नाते त्याच्या मनाशी ...
कोणी हसवणारे तर कोणी रडवणारे असे भेटीत राहती मग
आपणास आयुष्याच्या प्रत्येक टप्यावरी ...

- B s H r I

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

  स्वप्न


स्वप्न असतात निरनिराळी आणि अनेक...
पण माझे मात्र एकच आहे काहीसे मनाच्या कोपऱ्यात दडलेलं सुरेख....

माहीत नाही कसली ओढ आहे ही ज्याने वेड धरले आहे हृदयाशी...
पण सारखे वाटत राहते असावे एक 'घर' समूद्र किनार्यापाशी....

अगदीच समुद्र किनारी असे कही नाही तर नदीकाठी देखील चालेल...
 इच्छा आहे गोआ मधील असावे एक पण निसर्ग रम्य कोकणात देखील मन रमेल....

पण हव ते एक घरच ज्यात अपेक्षा नाही फार सुखी-सुवीधांची...
विसाव्याची सोय आणि भूक भागण्याची साधने असावी एवढीच काय ती इच्छा आहे मापक गोष्टींची....

घरा मागील तो नीळा समूद्र अन् त्याची ती पांढरी शुभ्र वाळू असे किनार्यापरी...
मनास भोवणारे अन्  सुखद आनंद देणारे हे निसर्गाचे रूप नेई आयुष्यास सर्वतोपरी....

झाडा-माडांच्या सांनीध्यातले ते एक घर यावे सत्यात...
अन् पाहिलेल्या त्या स्वप्नाला जगता यावे कोण त्या एकाशी जडवूनी सुंदर नात्यात....
- B s H r i

शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

      आठवण


आठवण येत असे तूझी नेहमी अन् सतत...
पण माजीच मी फसवीत असे मनाला की नाही असे काहीसे वाटत....

आठवणीतला तू अजून असशील का रे तसाच अविचल अन स्वच्छंदी...
की बदलत्या काळाबरोबर तू देखील बदलला आहेस काहीसा अगदी....

किती ठरवले तरी  तुझी ओढ काही केल्या कमी होत नसे...
मग माझीच मी मला काही गोष्टींमध्ये रमवून घेत असे....

भेटावे कधीतरी असे सारखे वाटत राहते मनाशी...
मात्र आयुष्यात तू एवढा दंग झालायस कि नाही वेळ मिळे तुला माज्यापाशी....

दिवसा मागून दिवस जाई तसेच मीही तूला विसरत असे...
अश्याच असतील का भावना तुज्या कि असेल अजून वेगळेच काहीसे....

सोडूनी तुझा नाद मग जगायचे ठरवले मी एकटे जेव्हा...
कि मध्येच दिसतोस तू अन्  परत मग आठवणी साद घालीत राहतात तूझ्या तेव्हा....

                                                    - B s H r I




शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

कोण तू.... कोण मी...


सहज अशी भेट झाली.....
वाटल नव्हत पुन्हा एवढ्या लवकर भेट होईल असे...
माहित नव्हते काही, मात्र नकळत सुर जुळून आले कसे...
विश्वास टाकला निर्धास्त होऊनी.. 
पण मनातली भीती मात्र घेत नसे हे काही स्विकारूनी....


कोण तू? कोण मी?

सहजच अशी मैत्री घडली...
कोणास का कळेना पण 'सखा' हा शब्द ह्रदयाशी येतो..
जेव्हा केव्हा आठवणीतला तू त्या मनाशी बोलू लागतो... 
पाहत असलेले स्वप्न मी, जगत होतास तू ते जेव्हा..
म्हणूनी का असेना पण मी ही तेच क्षण
अनूभवास लागले ते तसे तेव्हा...


कोण तू? कोण मी?

सहज अशी  नाती वीणली...
आहे मनी अजूनी तरी ते एक न सुटणारे कोडे...
काय होते ते, ज्याने आणले दोन वाटसरूंना त्या पाऊल वाटे कडे...
वेड होते तसे, की नाद भटकंतीचा...
मुक्तछंद उडणाऱ्या त्या पाखराच्या भ्रमंतीचा....


कोण तू? कोण मी?

कोण तू? कोण मी?
ना उलगडले हे गुपित कोणी...
ना करावा असा प्रशन पुन्हा बोलूनी...
मग उत्तर काढले की जगावे स्वच्छंदी तसेच त्या अनोळख्या व्यक्तीसंगी...

                                                   - B s H r I